Last Updated: Tuesday, November 12, 2013, 11:29
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई आपल्या आणि अंकिताच्या नात्याबद्दल मीडियात सुरू झालेल्या उलट-सुलट चर्चेमुळे सुशांत सिंह राजपूत चांगलाच वैतागलाय.
छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेऊन धम्माल उडवून देणाऱ्या सुशांतच्या करिअर वेगळं वळण मिळालं... सोबतच त्याच्या खाजगी आयुष्यावरही त्याचे परिणाम दिसू लागले. अंकिता आणि सुशांतमध्ये जोरदार भांडण झालं आणि त्याची परिणीती म्हणजे अंकितानं सुशांतच्या थोबाडात ठेऊन दिली, अशा बातम्या मीडियामध्ये मध्यंतरी आल्या होत्या. पण, सुशांतनं मात्र ही बाब नाकारलीय.
‘माझ्या खाजगी आयुष्यासंबंधी लोकांना वेगवेगळ्य कथा तयार करण्यासाठी मला वाव द्यायचा नाही. मी आता इतकचं म्हणेन की आता सर्व काही ठिक आहे... आणि मीडियात आलेल्या बातम्यांप्रमाणे काहीही घडलं नव्हतं... याचसोबत मी यासाठिही खूप खूश आहे की आम्ही लवकरच लग्न करणार आहोत’ असं सुशांतनं म्हटलंय. ‘पवित्र रिश्ता’ या छोट्या पडद्यावरील मालिकेत ‘मानव-अर्चना’ अर्थातच सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे यांची जोडी भलतीच लोकप्रिय ठरली होती.
सुशांत सध्या त्याच्या येणाऱ्या सिनेमांमध्ये खूप व्यस्त आहे. ‘माझ्याजवळ सध्या चांगले सिनेमे आहेत. दिवाकर बॅनर्जी आणि शेखर कपूर यांच्यासोबत मी दोन वेगवेगळ्या सिनेमांत काम करतोय. यासाठी मी खूप उत्सुक आहे. त्यांच्या अपेक्षा खूप जास्त आहेत, त्यासाठी मला उत्तम काम करायचं आहे’, असं सुशांतनं म्हटलंय.
सुशांत शेखर कपूर सोबत ‘पानी’, तर बॅनर्जीसोबत ‘डिटेक्टिव ब्योमकेश बक्षी’ या सिनेमातून काम करताना दिसणार आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, November 12, 2013, 11:29