Last Updated: Monday, October 28, 2013, 10:34
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईकेंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदेना ‘रज्जो’नं मोहिनी घातलीय. त्यामुळंच की काय रविवारी गृहमंत्री रज्जोच्या म्युझिक लाँचला पोहचले.
पाटणा साखळी स्फोटानंतर गृहमंत्री घटनास्थळाला भेट देऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र सुशील कुमार शिंदेंनी त्याऐवजी मुंबईत येऊन ‘रज्जो’ सिनेमाचं म्युझिक लॉन्च करण्याला महत्व दिलं.
पाटण्यात साखळी स्फोट झाल्यावर आणि देशभरात हाय अलर्ट असतानाही देशाचे गृहमंत्री सुशील कुमार शिंदे मात्र एका सिनेमाच्या म्युझिक लाँच कार्यक्रमात मशगूल होते. पुन्हा त्यांनी आपला मुंबईतील कार्यक्रम हा पूर्वनियोजित असल्यामुळं त्यासाठी हजर राहण्यात काहीच गैर नाही, असं या दौऱ्याचं समर्थनही केलंय.
विश्वास पाटील यांच्या ‘रज्जो’ या सिनेमाचं काल केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते मुंबईत म्युझिक लाँच झालं. पाटण्यात बॉम्बस्फोट झालेले असतानाही आपण मुंबईत राहून सतत पाटण्यातील अधिकाऱ्यांच्या आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संपर्कात असल्याचंही शिंदे यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाला सुशील कुमार शिंदे यांच्यासह या सिनेमाचे लेखक-दिग्दर्शक विश्वास पाटील, अभिनेत्री कंगना राणावत, पराग अरोरा, संगीतकार प्रितम सिंग यांच्यासह इतर सेलिब्रिटीही उपस्थित होते.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, October 28, 2013, 10:34