Last Updated: Saturday, April 13, 2013, 08:43
www.24taas.com, मुंबईसुश्मिताने मिस युनिव्हर्सचा किताब आपल्या नावी करुन भारताचे नाव उंचावले होते. शिवाय सुश्मिताने दोन मुलींना दत्तक घेऊन त्यांचे पालनपोषण करत आहे. सुश्मिताने स्वबळावर बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले. प्रोफेशनल लाईफमध्ये सुश्मिता यशस्वी झाली, मात्र पर्सनल लाईफमध्ये तिला खरा जोडीदार अद्याप मिळू शकला नाही.
सुश्मिताला जेव्हा जेव्हा तिच्या प्रेमप्रकरणाबद्दल विचारले गेले, तेव्हा तेव्हा बिनधास्तपणे ती या विषयावर बोलली. लवकरच सुश्मिताची ऑटोबायोग्राफीसुद्धा बाजारात येणार आहे. `द बटरफ्लाय` या नावाने प्रकाशित होणा-या सुश्मिताच्या ऑटोबायोग्राफीमध्ये अनेक आश्चर्यकारक खुलासे करण्यात आले आहेत.
मिस युनिव्हर्स झाल्यानंतर सुश्मिता दिग्दर्शकांची पहिली पसंती ठरली होती. तिला अनेक सिनेमांचे ऑफर्स मिळाले. यादरम्यान महेश भट्ट यांनी तिला `दस्तक` या सिनेमाची ऑफर दिली. या सिनेमाने सुश्मिताचे फिल्मी करिअर सुरु झाले. यादरम्यान सुश्मिताचे विक्रम भट्टबरोबर अफेअरसुद्धा सुरु झाले होते. सुश्मिताच्या अफेअर्सची यादी भली मोठी आहे. एक दोन नव्हे तर चक्क सात जणांबरोबरचे सुश्मिताचे अफेअर गाजले.
First Published: Friday, April 12, 2013, 23:12