तनिषानं अरमान कोहलीला दिलं खास गिफ्ट! Tanisha Mukherjee and Armaan Kohli in Dubai

तनिषानं अरमान कोहलीला दिलं खास गिफ्ट!

तनिषानं अरमान कोहलीला दिलं खास गिफ्ट!

www.zee24taas.com, झी मीडिया, मुंबई ,

बिग बॉसमधील चर्चित तनिषा मुखर्जीने घरातून नापंसती असतानाही, अरमान कोहलीचा वाढदिवस खास पद्धतीनं साजरा केलाचं समजतंय. त्यासाठी तिनं त्याच्यासोबत काही सुट्ट्या एकत्र घालवल्यात.

अरमानचा वाढदिवस २३ मार्चला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तनिषा अचानकपणे अरमानच्या घरी आली आणि त्याचं सामान पॅक केलं. सुरुवातीला अरमानला ती गंमत करतेय असं वाटलं. मात्र तनिषाने सांगितलं की दोघांसाठी दुबई तिकट काढली आहेत. तेव्हा तो आश्चर्य चकितच झाला.

तनिषाचं सरप्राईज एवढ्यावरचं थांबल नाही, तर दुबईला पोहचल्यावर ती अरमानला लिमोलिनच्या फैसल अली राजवाड्यात घेऊन गेली. दोघांचं असं एकत्र राहणं हे काही पहिल्यांदा नव्हतं. याआधीही दोघे गोव्यात नवीन वर्ष साजरं करतांना दिसले होते.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, March 25, 2014, 12:01


comments powered by Disqus