रामगोपाल वर्मा टॅक्स अधिकाऱ्यांच्या जाळ्यात!, Tax officials raid Ram Gopal Varma’s office

रामगोपाल वर्मा टॅक्स अधिकाऱ्यांच्या जाळ्यात!

रामगोपाल वर्मा टॅक्स अधिकाऱ्यांच्या जाळ्यात!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

सिनेमा निर्माते आणि दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांच्या कार्यालयावर सर्व्हिस टॅक्स विभागानं धाड टाकलीय.
मुंबईत ओशिवरास्थित रामगोपाल वर्मा फिल्म्स फॅक्टरीच्या कार्यालयात सर्व्हिस टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी जवळजवळ आठ तासांपेक्षा जास्त वेळ तपासणी केलीय. रामगोपाल वर्मा आणि त्यांच्या सीएची चौकशीही यावेळी करण्यात आली. अधिकाऱ्यांनी वर्मांच्या अंधेरीतील मिल्लतनगरस्थित कार्यालयासंबंधीही चौकशी केली.

सूत्रांच्या माहितीनुसार, रामगोपाल वर्मा यांनी आपल्या कंपनीला सर्व्हिस टॅक्स विभागामध्ये रजिस्टर केलेलं नाही. त्यामुळे आता सर्व्हिस टॅक्स विभाग त्यांच्या कार्यालयावर टाकलेल्या धाडीच्या आधारे त्यांच्याकडून सर्व्हिस टॅक्स वसूल करणार आहे. सिनेमा दिग्दर्शकांना सर्व्हिस टॅक्स जमा करणं गरजेचं असतं.

ज्यांना नोटीशी धाडण्यात आल्यात त्या १३२ फिल्म सेलिब्रिटींमध्ये वर्मा यांच्या नावाचा समावेश नाही. त्यांच्याजवळ वर्मा प्रोडक्सन हाऊसेसचा एकही रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचं, चौकशीत सर्व्हिस टॅक्स अधिकाऱ्यांच्या लक्षात आलंय. त्यामुळे वर्मा यांनी २०१० नंतर काम केलेल्या सर्व प्रोजेक्टसची तपासणी या विभागानं करण्यास सुरुवात केलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, September 12, 2013, 16:11


comments powered by Disqus