`टीचर` शर्लिनचा `नग्न` शिक्षक दिन teacher Sherlyn`s nude teacher`s day

`टीचर` शर्लिनचा `नग्न` शिक्षक दिन

`टीचर` शर्लिनचा `नग्न` शिक्षक दिन
www.24taas.com, मुंबई

`प्लेबॉय` मासिकासाठी नग्न फोटोशूट करणाऱ्या शर्लिन चोप्राने आता अश्लीलतेच्या सर्वच मर्यादा ओलांडायचं ठरवलं असावं. कारण, चर्चेत राहाण्यासाठी शर्लिन वाट्टेल त्या थराला जात आहे. यासाठी शिक्षक दिनासारख्या पवित्र दिवसाचाही शर्लिनने निर्लज्जपणे वापर केला आहे.

५ सप्टेंवर रोजी शिक्षक दिनानिमित्त शर्लिनने आपले नग्न फोटो ट्विटरवर अपलोड केले आणि विशेष म्हणजे या फोटोंना विद्यार्थी वर्गासाठी शिक्षक दिनाची खास भेट म्हणून संबोधलं आहे. या फोटोबरोबरच ‘टिचर’ शर्लिनने ट्विट केलं आहे, “गुड मॉर्निंग स्टुडंट्स... सायलेंस प्लीज... गेटडाऊन ऑन युवर नीज... अँड लाय डाऊन ऑन युवर बॅक..अँड स्टिल युवर माइंड”

काही दिवसांपूर्वीच शर्लिनने पेड सेक्सवर ट्विट केलं होतं. यावर मीडियामध्ये बातम्या छापून आल्यावर याबद्दल आक्षेपही घेतला होता. मात्र सतत चर्चेत राहाण्यासाठी शिक्षक दिनाच्या वेळी मुलांना ‘अशा’ गोष्टी शिकवणं अयोग्य आहे, हे तिला कोण समजवणार?

First Published: Thursday, September 6, 2012, 10:49


comments powered by Disqus