शाहरुख म्हटला तर उतरवेल कपडे- पूनम पांडे - Marathi News 24taas.com

शाहरुख म्हटला तर उतरवेल कपडे- पूनम पांडे

www.24taas.com, मुंबई
 
बिकनी गर्ल म्हणून नावा रुपाला आलेली बदनाम मॉडेल पूनम पांडे ही वायफळ बडबड पुन्हा सुरू झाली आहे. तीचे कोणतेही वक्तव्य नवे वादळ निर्माण करते. कोणती इच्छा पूर्ण झाल्यावर ती न्यूड किंवा सेमी न्यूड व्हायला झटपट तयार असते.
 
आता या पूनम बाईनी आपला मोर्चा किंग खान शाहरुखकडे वळवला आहे. पूनम पांडे शाहरुख खानची जबरदस्त फॅन आहे. आता ही बया म्हणते, शाहरुखने सांगितले तर मी झटपट न्यूड होईल. आता याला काय म्हणावे?
 
शाहरुख खानची टीम कोलकता नाईट रायडर्स यंदाच्या आयपीएल सीझनमध्ये जबरदस्त कामगिरी करीत आहे. मात्र, मागील दोन सामने त्यांनी गमावले आहेत. शाहरुखची टीम पराभूत होते आहे, हे या बयेला पाहवत नाही आहे. त्यामुळे ती दुःखी झाली आहे. टीमचे मनोबल उंचावण्यासाठी शाहरुख खानने सांगितले तर टीमसमोर न्यूड व्हायला तयार असल्याची ऑफर पूनमने दिली आहे.
 
एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत पूनम म्हणाली, शाहरुखने सांगितले तर मी न्यूड व्हायला तयार आहे. माझ्या न्यूड होण्याने शाहरुखची टीम जिंकणार असेल तर त्यात चुकीचे काय आहे, अशी मखलाशीही या बयेने केली आहे.
 

First Published: Wednesday, May 16, 2012, 17:49


comments powered by Disqus