जॅकी चॅन थकला, यापुढे स्टंट करणार नाही - Marathi News 24taas.com

जॅकी चॅन थकला, यापुढे स्टंट करणार नाही

www.24taas.com, लंडन
 
ज्याने आपल्या स्टंटने साऱ्या जगाला वेड लावले, आणि त्याचे खरे स्टंट पाहण्यासाठी लहानांपासून सगळेच उत्सुक असायचे असा आपला आवडता मार्शल आर्टचा सुपरस्टार जॅकी चॅनने अॅक्शन हिरोच्या भुमिकेतून संन्यास घेतला आहे.
 
म्हणजेच आता आपल्याला त्याचे नवनवे स्टंट पाहता येणार नाही. चॅनने आजवर १०० अॅक्शनपट केले आहेत. आणि त्याचा शेवटचा अॅक्शनपट  'चायनीज जोडिआक' होता. ५८ वर्षीय हॉलिवूड स्टार जॅकीने म्हटलं आहे की, वय जास्ती होत चालल्याने आता स्टंट करणं जरा त्रासदायक होत आहे, आणि त्यासाठी आता मी परफेक्ट नाहीये. तसेच जगभर खूप हिंसा वाढली आहे.
 
ज्यामुळे मी अॅक्शनपटात मी यापुढे काम करणार नाही असं ठरवलं आहे. मी आता तरूण राहिलेलो नाही. मी आता खरचं थकलो आहे. मला अॅक्शनपट करणं नेहमीच आवडतं, मी स्टंट करणं पसंत करतो, पण हिंसेपासून मला प्रचंड तिटकारा आहे. चॅनने म्हटलं की, अॅक्शनशिवाय असणारे सिनेमा तो करत राहणार आहे.
 
 
 
 
 

First Published: Sunday, May 20, 2012, 12:32


comments powered by Disqus