करिश्माच्या संसाराला प्रिया सच’देव’चा शाप! - Marathi News 24taas.com

करिश्माच्या संसाराला प्रिया सच’देव’चा शाप!

www.24taas.com, मुंबई
बॉलीवुडची निळ्या डोळ्यांची सुंदरी करिश्मा कपूर आणि दिल्ली स्थित व्यावसायिक संजय कपूर यांच्या संसारात उठलेले वादळ उठले होते. ते गेल्या काही वर्षांपूर्वी प्रकाशात आले, पण करिश्माच्या या संसाराला कोणाचा शाप लागला हे माहित नव्हते, परंतु, संजय कपूरला सामाजिक कार्यकर्ती प्रिया सचदेव प्रसन्न झाली, पण ती करिश्माच्या संसाराला शाप ठरली.
 
 
करिश्माच्या संसाराला नजर लागली ती २०१० पासून... जेव्हा संजय आणि प्रिया यांच्या गाठी भेटी वाढल्या. या गाठीभेटी इतक्या वाढल्या की त्या दिल्लीतील सोशल पार्टीच्या फोटोमध्ये प्रकर्षाने दिसून आल्या.
 
 
यापूर्वी करिश्मा हिच्याशी लग्न होण्यापूर्वी संजयचे डिझानर नंदिता मतानी हिच्याशी लग्न झाले होते. तर प्रिया सचदेव हिने न्यूयॉर्क स्थित विक्रम चटवाल याच्याशी सौभाग्य गाठी जोडल्या. विक्रमपासून प्रियाला एक मुलगीही आहे.
 
 
आता संजयला आपला भूतकाळ विसरून प्रियासंगे संसार थाटायचा आहे. त्यासाठी त्याने करिश्माला कायदेशीर नोटीस पाठवली असून करिश्माला हे सर्व माहित आहे. तिने याचा सामना करण्याचा निर्णय घेतला आहे.

First Published: Tuesday, May 22, 2012, 17:59


comments powered by Disqus