Last Updated: Wednesday, May 23, 2012, 16:44
www.24taas.com, मुंबई रोमँटिक कॉमेडी असलेल्या कॉकटेलद्वारे पुन्हा एकदा दीपिका पदुकोण आणि सैफ अली खान यांची जोडी दिसणार हे. यापूर्वी हे दोघे लव आजकल आणि आरक्षण या चित्रपटात एकत्र दिसले होते. कॉकटेल हा लव आजकलहून फारच वेगळा चित्रपट असल्याचे दीपिका पदुकोण हिने सांगितले आहे.
इम्तियाज अली यांच्या दिग्दर्शनाखालील लव आजकल आणि प्रकाश झा यांच्या आरक्षण चित्रपटानंतर ही जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.
सैफ आणि मला एकत्र पाहिल्यावर त्यांना लव आज कलची आठवण होते. परंतु कॉकटेल हा फारच वेगळा चित्रपट आहे. इम्तियाज अली यांनी याची पटकथा लिहिली आहे. तर होमी अदजानिया यांनी याचे दिग्दर्शन केले असल्याचे दीपिकाने सांगितले.
या चित्रपट रोमांटिक असून यात दोस्ती, मस्ती, धोका, विश्वास सर्व काही दाखविण्यात आले आहे. या चित्रपटाद्वारे मॉडेल डायना पेँटी बॉलिवुडमध्ये पदार्पण केले आहे. यात प्रेम त्रिकोण असून यात पेंटीने मीरा कॅरेक्टर प्ले केले असून दीपिकाने वेरोनिका कॅरेक्टर प्ले केले आहे.
First Published: Wednesday, May 23, 2012, 16:44