Last Updated: Thursday, May 24, 2012, 18:23
www.24taas.com, मुंबईरावडी राठोड या चित्रपटाद्वारे सात वर्षानंतर मारधाड चित्रपटात पुनरागमन करणाऱ्या अक्षय कुमारने आता जाणूनबुजून अक्शन चित्रपटांना नकार दिला होता.
गेल्या काही वर्षात लोक कॉमेडी चित्रपटांना पसंती देत होत, त्यामुळे मी माझा मोर्चा कॉमेडीकडे वळवला होता, आता लोकांना अॅक्शन चित्रपट पसंत येत आहेत, त्यामुळे मी आता या चित्रपटांकडे वळलो असल्याचे अक्षय कुमार याने सांगितले.
गेल्या सात वर्षात मला अनेक अॅक्शन चित्रपटांचे प्रस्ताव आले होते. परंतु, कॉमेडी चित्रपटांची चलती असल्याने मी ते प्रस्ताव स्वीकारले नाहीत. साधारण १४-१५ वर्षांपर्यंत मी मारधाड चित्रपटात काम केले आहे. त्यातून जरा ब्रेक पाहिजे होता, त्यामुळे मी कॉमेडी चित्रपटांकडे वळलो होतो.
आपण एखाद्या प्रोडक्ट प्रमाणे आहोत, प्रेक्षकांना जसे हवे आहेत, तसे आपण देण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यांना तेव्हा कॉमेडी चित्रपट पाहावेसे वाटायचे, पण आता ते पुन्हा अॅक्शन चित्रपटाकडे वळाले आहेत, त्यामुळे मी या चित्रपटांमध्ये मी काम करीत असल्याचे अक्षयने सांगितले.
First Published: Thursday, May 24, 2012, 18:23