'3 इडियट्स' ओलांडणार चीनची भिंत - Marathi News 24taas.com

'3 इडियट्स' ओलांडणार चीनची भिंत

झी २४ तास वेब टीम, पणजी
 
बॉक्सऑफीसवर लोकप्रियतेचा उच्चांक गाठणारा 'थ्री इडियट्स' सिनेमा आता चीनी रसिकांनाही मोहून टाकणार आहे. कारण ८ डिसेंबरला तब्बल ९०० प्रिंट्ससह हा सिनेमा चीनमध्ये रिलीज होतोय. विधू विनोद चोप्रा यांनी गोव्यातल्या इफ्फीत ही माहिती दिली.
 
'थ्री इडियट्स' सिनेमाने बॉक्सऑफिसवर करिष्मा केला होता. या सिनेमाची कथा, गाणी, हे सारं काही प्रेक्षकांना भावलं आणि आता हाच सिनेमा आणखी एक नवा रेकॉर्ड करण्यासाठी सज्ज झालाय. कारण लवकर हा सिनेमा चीनमध्ये रिलीज होणारेय. ९०० प्रिंटसह हा सिनेमा चीनमध्ये रिलीज करण्यात येणार असल्याचं नुकतच या सिनेमाचे निर्माते विधू विनोद चोप्रा यांनी गोवामध्ये सुरू असलेल्या इफ्फी महोत्सवात सांगितलं.
 
आत्तापर्यंत 'थ्री इडियट्स'ला भारतासह हाँगकाँग आणि तैवानमध्ये चांगला प्रतिसाद मिळालाय आणि आता चीनमध्ये हा सिनेमा रिलीज होत असल्यामुळे हा सिनेमा तीन वर्षांनंतरही जगभर आपली मोहर उमटवतोय हेच अधोरेखित होतंय आणि भारतीय सिनेमासाठी ही मोठी अभिमानाचीच बाब आहे.

First Published: Saturday, December 3, 2011, 15:14


comments powered by Disqus