करण जोहरच्या बर्थडे पार्टीत ताऱ्यांचा झगमगाट - Marathi News 24taas.com

करण जोहरच्या बर्थडे पार्टीत ताऱ्यांचा झगमगाट

www.24taas.com, मुंबई
 
करण जोहरची बर्थडे पार्टी अपेक्षेप्रमाणेच बॉलिवूडमधील एक सोठी घटना ठरली. मोठमोठे स्टार्स करण जोहरच्या पार्टीला आवर्जून उपस्थित होते. शाहरुख खान, प्रियंका चोप्रा, बिपाशा बासू, अमिर खान, हृतिक रोशन इत्यादी मोठमोठे कलाकार पार्टीत ब्लॅक अँड व्हाइट वेषात हजर होते.
 
शुक्रवारी करण ४० वर्षांचा झाला. त्यानिमित्ताने नॉटी ऍट फोर्टी ही थीम निवडून वांद्र्याच्या हॉटेल ताज लँड्स एंडला या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. पार्टीतील पोषाकांची ब्लॅक अड व्हाईट थीम फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने ठरवली होती. त्याचप्रमाणे सर्वांचे कपडेही ब्लॅक अँड व्हाईट होते.
 
या पार्टीत करणचा जवळचा मित्र शाहरुख आपली पत्नी गौरीसह आला होता. आमिर-किरण राव, हृतिक रोशन-सुझान खान, संजय-मान्यता दत्त, रितेश देशमुख-जेनेलिया डीसूजा, गोल्डी बहल-सोनाली बेंद्रे अशा बॉलिवूडमधील कित्येक जोड्या पार्टीला जातीने हजर होत्या. तर बिपाशा, सोनाक्षी सिन्हा, करीना कपूर तसंच करिश्मा कपूर पार्टीत आकर्षक दिसत होत्या. स्टार्सबरोबर पार्टीला जुगल हंसराज, करण मल्होत्रा, पुनित मल्होत्रा आणि सूरज बड़जात्या हे दिग्दर्शकदेखील उपस्थित होते.

First Published: Saturday, May 26, 2012, 15:59


comments powered by Disqus