Last Updated: Sunday, December 4, 2011, 08:25
झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
ज्येष्ठ अभिनेता आणि प्रसिद्ध कलाकार देवानंद याचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज पहाटे निधन झालं. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, पंतप्रधान मनमोहन सिंह आणि कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्यांच्या निधनामुळे तीव्र शोक व्यक्त केला. पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी त्यांच्या भावना व्यक्त करताना सांगितले की, देवानंद हे एक महान अभिनेता होते. तसचं त्यांनी म्हटंल की, त्यांच्या लाखो चाहत्यांप्रमाणे मीही एक त्यांचा चाहता होतो.
सूचना आणि प्रसारण मंत्री अंबिका सोनी यांनी देवानंद यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. तसंच देशातला एक अद्भूत अभिनेता गमावल्याचे त्यांनी म्हटले. भाजपा नेता स्मृती इराणी आणि हेमा मालिनी यांनी देखील देवानंद यांच्या निधनावर शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
First Published: Sunday, December 4, 2011, 08:25