बोल्ड दीपिका करणार क्लीन बोल्ड... - Marathi News 24taas.com

बोल्ड दीपिका करणार क्लीन बोल्ड...

 www.24taas.com , मुंबई
 
दीपिका पदुकोण आणि बॅडमिंटन यांचं नातं जुनं आहे मात्र दीपिका आणि क्रिकेट? हे काही कुणाच्या पचनी पडत नाही. त्यामुळे सध्या दीपिकाचंही कॉकटेल झालं आहे. क्रिकेटच्या मंचावर जर दिपीका पदुकोण दिसली तरी नक्कीच कॉकटेल होईल ना?
 
आणि काहीस असंच चित्र दिसलं जेव्हा दीपिका पदुकोण उतरली ती क्रिकेटच्या मंचावर. यावेळी दीपिकाने शाब्दीक फटकेबाजी करत आपल्या कॉकटेल सिनेमाचं जोरदार प्रमोशन केलं. नुकताच कॉकटेल सिनेमाचा फर्स्ट लूक आऊट झाला आणि  दिपीकाच्या लूकची खूपच चर्चा झाली.
 
यात दीपिका बोल्ड भूमिका साकारते आहे. अशी बोल्ड भूमिका साकारणं दीपिकासाठी नक्कीच आव्हानात्मक होतं. आणि हे आव्हान तिने लिलया पेललं. कारण दीपिकाच्या या बोल्ड अंदाजावर प्रेक्षक आत्तापासूनच क्लीन बोल्ड होणार यात काही वादच नाही.
 
 
 

First Published: Monday, May 28, 2012, 18:35


comments powered by Disqus