Last Updated: Tuesday, May 29, 2012, 16:56
www.24taas.com, मुंबई जर हॉलिवूडला ब्रँजेलिनाच्या लग्नाचे वेध लागले आहते, तर बॉलिवूडला सैफिनाच्या लग्नाचे. सैफ अली खानशी करीना कपूर नेमकी कधी विवाहबद्ध होणार, याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मात्र, लग्नानंतरही मी सिनेमात काम करत राहीन यावर करीना ठाम आहे.
करीना येत्या ऑक्टोबरमध्ये सैफ अली खानसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सिनेवर्तुळात रंगली आहे. खरंतर २०१२ वर्षाच्या सुरुवातीलाच दोघे लग्न करणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. त्यानंतर ‘एजंट विनोद’ या सैफच्या होम प्रोडक्शन असलेल्या सिनेमाच्या रीलीजनंतर लग्न करणार असल्याचं सांगण्यात येत होतं. सध्या बोबो ‘हिरॉइन’ सिनेमाच्या चित्रिकरणात बिझी आहे, हा सिनेमा ती ऑक्टोबर पूर्वीच पूर्ण व्हावा, यासाठी ती घाई करत आहे, अशी चर्चा सध्या ऐकायला येत आहे. १६ ऑक्टोबरला कदाचित दोघांचा विवाह होईल, अशी सांगितले जात आहे.सध्या करीना सैफ अली सोबत टर्की येथे 'रेस २' सिनेमात काम करत आहे. लवकरच दोघेही आपल्या लग्नाची अधिकृत घोषणा करतील, असं सांगितलं जात आहे.
लग्नाबद्दल विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांनी करीना सध्या प्रचंड हैराण झाली आहे. ती म्हणाली, “२००९ पासून मला लग्नाच्या तारखेबद्दल शंभरवेळा विचारणा झाली आहे. माझ्या आणि सैफपेक्षा इतरांनाच आमच्या लग्नाची घाई झाली आहे, असं वाटतंय. मी काही लग्नासाठी ब्रेक घेणार नाहीये. २५ जूलैला हिरॉइन सिनेमाचं शूटिंग संपलं की मी लगेच संजय लीला भन्साळी यांच्या ‘राम लीला’ सिनेमाचं शूटिंग सुरू करणार आहे. या सिनेमात माझ्याबरोबर रणवीर सिंग असेल. तसंच आणखी एका मोठ्या सिनेमाबद्दलही निर्मात्यांशी माझी बोलणी चालली आहेत. त्याचं शूटिंग या वर्षा अखेरीपर्यंत सुरू होईल. ”
लग्नानंतर सिनेमात काम करणं बंद करणार का? असा प्रश्न जेव्हा करीनाला विचारला गेला, तेव्हा खळाळून हसत करीना म्हणाली, “अजिबात नाही. लग्नामुळे काहीही बदलणार नाही. जोहरा सेहगल यांच्या प्रमाणे मीसुद्धा जेव्हा १०० वर्षांची होईन, तेव्हा सिनेमात काम करतच राहीन.”
First Published: Tuesday, May 29, 2012, 16:56