‘ब्रेकअप के बाद’ पुन्हा शाहीद-प्रियांका एकत्र - Marathi News 24taas.com

‘ब्रेकअप के बाद’ पुन्हा शाहीद-प्रियांका एकत्र

 www.24taas.com, मुंबई 
 
शाहीद कपूर आणि प्रियांका चोप्रा यांची प्रमुख भूमिका असलेला ‘तेरी मेरी कहानी’ हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज झालाय. त्यामुळे प्रियांका आणि शाहीद  दोघंही सिनेमाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत.
 
ब्रेक-अपनंतर एखादं कपल एकत्र सिनेमात झळकणार म्हणजे त्यांच्या सिनेमाची चर्चा होणं अपेक्षितचं आहे. आणि ती नाही झाली तरचं नवल. शाहिद आणि प्रियांकाच्या बाबतीतही काहीसं असंच म्हणता येईल. ‘तेरी मेरी कहानी’ हा त्यांचा आगामी सिनेमा लवकरच रिलीज होतोय.  तीन काळातली ही लव्हस्टोरी. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे जावेद आणि आराधना. तर १९६०च्या दशकातल्या गोविंद आणि रुकसारचीही तीच कथा. त्यांचं एकमेकांवरचं प्रेम इतकं घट्ट आहे की, काळ बदलतो तरी त्यांचं नातं प्रत्येक काळात तेच रहातं. २०१२ मध्ये पुन्हा एकदा राधा आणि क्रिशच्या रुपाने हे दोघं एकत्र येतात. अशी ही कथा... आता त्यांचं प्रेम यशस्वी होतं का? त्यांच्या आयुष्यात काय चढ-उतार होतात, याचं चित्रण सिनेमात पाहायला मिळणार आहे.
 
या रोमॅण्टिक सिनेमात प्रियांका आणि शाहीदची हॉट केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सध्या दोघंही आपल्या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करताना दिसतायेत. पण, शाहिद-प्रियांकाच्या या सिझलिंग केमिस्ट्रीला प्रेक्षक स्विकारतात का? ते चित्रपट पडद्यावर झळकल्यावरच कळेल.
 

First Published: Tuesday, May 29, 2012, 18:24


comments powered by Disqus