Last Updated: Thursday, May 31, 2012, 23:19
www.24taas.com, मुंबई विकी डोनर, कहानी, पान सिंग तोमर या सारख्या वेगळ्या धाटणीच्या सिनेमांनी सध्या तिकीट खिडकीची गणितंच बदललीत. नेहमीप्रमाणे मसाला सिनेमांना फाटा देत या फिल्मनी ऑफ बिट सिनेमाही कुछ कम नही असंच दाखवलंय. आणि आता यात भर पडतेय ती ‘शिरीन फरहाद की तो निकल पडी’ य़ा सिनेमाची.
रोमॅण्टिक प्रेम आणि अवखळ निशा नाही तर हे आहेत चाळीशीतले शिरीन आणि फरहाद. या दोन पारसी व्यक्तिरेखांची प्रेमकहाणी. काहीशी बिनधास्त शिरीन आणि हळवा प्रेमळ फरदाह.. हा धमाल प्रमकहाणी आपल्य़ासाठी घेऊन येतेय बेला भन्साळी सेहेगल. कोरिओग्राफर डायरेक्टर फराहा खान आणि अभिनेता बोमन इराणी यांनी ही शिरीन फरहाद ची जोडी रंगवलीय.
आता अभिनेत्री म्हणून फराह पहिल्यांदाच या सिनेमातून आपल्या समोर येतेय. तर बोमननंही तिला झक्कास साथ दिलीय.मुख्य म्हणजे साईज झिरो, सिक्स पॅक्स ऍब्स, आयटम नंबर हा नेहमीचा हिट फॉर्म्युला या सिनेमा साठी नं वापरता, सशक्त कथानक आणि त्याची विनोदी मांडणी याचा वापर सिनेमात करण्यात आलाय. हा सिनेमा हटके आहे हे लक्षात येतं. तेव्हा आता वाट पाहुयात मॉडर्न शिरीन फरहादची ही अनोखी लव्ह स्टोरी स्क्रीनवर कधी येते त्याची..
First Published: Thursday, May 31, 2012, 23:19