Last Updated: Friday, June 1, 2012, 19:19
www.24taas.com, मुंबई पूनम पांडेचे इंटरनेटवरचे फोटो म्हणजे कहरच. तिच्या या सवंग लोकप्रियतेपुढे सगळ्यांनीच हात टेकलेत. पण, आत्ता आलेली बातमी ही खरंच धक्कादायक आहे. पूनम पांडेला तिचे फोटो पाहून जास्तीत जास्त एखाद्या बॉलिवूडच्या हॉट फिल्मची ऑफर येईल असं वाटत होतं. पण, पूनमला ऑफर आली आहे ती चक्क टीम अण्णाची सदस्य होण्यासंबंधी. आता बोला.
एका वृत्तानुसार रॅमन मॅगसेसे पुरस्कृत किरण बेदी यांनी पूनम पांडेकडे टीम अण्णा कँपेनचा एक भाग बनावं यासाठी निमंत्रण पाठवलं आहे. अण्णा हजारे आणि त्यांचे कॉम्रेड्स सध्या देशभर भ्रष्टाचाराविरुद्ध मोहिम चालवत आहेत. पण, त्यांचे प्रयत्न पुरेसे पडत नसल्याचं बेदींच्या लक्षात आलं. तेव्हा ही मोहिम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी आणि विशेषतः तरुणांची या आंदोलनास गर्दी व्हावी यासाठी बेदींनी चक्क पूनम पांडेलाच आंदोलनात सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं आहे.
केकेआर आयपीएलमध्ये जिंकल्यावर पूनम पांडेने नग्न छायाचित्रं प्रकाशित करून खळबळ माजवलेली होती. त्युळे ज्याच्या त्याच्या तोंडी सध्या पूनमचंच नाव आहे. त्यामुळे तिला टीम अण्णामध्ये सामिल करून घेतल्यास देशभरातील तरूण टीम अण्णाकडे आकर्षित होईल अशी बेदींची कल्पना आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध पूनम पांडे कशा प्रकारे आंदोलन करेल, याची कल्पनाच केलेली बरी!
First Published: Friday, June 1, 2012, 19:19