"कतरिना निर्लज्ज"- सोनम कपूर - Marathi News 24taas.com

"कतरिना निर्लज्ज"- सोनम कपूर

www.24taas.com, मुंबई
 
बॉलिवूडमध्ये सोनम कपूर आपल्या अभिनयामुळे जितकी चर्चेत राहिली नाही, तितकी वाट्टेल ती बडबडकरण्यामुळे चर्चेत राहाते. तिच्या बोलण्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या जात असतील, तरी सोनमला त्याचं काही वाटत नाही. जरी या इंडस्ट्रीतील मान्यवर, जवळचे लोक असतील, तरी त्यांनाही धारेवर धरायला सोनम कमी करत नाही.
 
या वेळी ‘आयेशा’ गर्ल सोनमने थेट कतरिनावरच निशाणा साधला. सोनमच्या 'मौसम' आणि 'प्लेयर्स' या दोन्ही फ्लॉप सिनेमांचा विषय काढला असता, सोनम म्हणाली "मी जे सिनेमे निवडते, ते लोकांना आवडतील का याचा मी विचार करते. कतरिनासारख्या वाह्यात भूमिका मी करत नाही. कतरिना निर्लज्ज आहे. त्यामुळे तिच्याशी माझी कधीच बरोबरी होऊ शकणार नाही."
कतरिना कैफ मला मुळीच आवडत नाही असं सोनम कपूरने बिनदिक्कत सांगितलं. यापूर्वीही सोनमने वरीष्ठ पत्रकार शोभा डे, तसंच रणबीर कपूरबद्दल अशीच मुक्ताफळं उधळली होती. ऐश्वर्या राय-बच्चनला देखील सोनमने ‘आंटी’ संबोधून बच्चन कुटुंबाचा रोष ओढावला होता. आता कतरिनावर टीका करून सलमान खानशीच तिने पंगा घेतलाय. आता अनिल कपूरला पुन्हा मध्यस्ती करण्यासाठी धावपळ करावी लागणार असं दिसतंय.

First Published: Saturday, June 2, 2012, 16:39


comments powered by Disqus