बरं का, सैफचं १६ ला लग्न - शर्मिला टागोर - Marathi News 24taas.com

बरं का, सैफचं १६ ला लग्न - शर्मिला टागोर

 www.24taas.com, मुंबई 
 
बरेच दिवस हो ना हो करत असलेले प्रेमी युगल १६ ऑक्टोबरला लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.  अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करिना कपूर यांचा निकाह १६ ऑक्टोबर रोजी होणार आहे, ही बामती सैफची आई शर्मिला टागोर यांनी प्रसिध्दी माध्यमांना दिली आहे.
 
हरयाणातील पटौदी येथे निकाह होईल आणि मुंबईत रिसेप्शन होण्याची शक्यता आहे. पटौदी संस्थानचे दहावे नवाब सैफचा निकाह पटौदीतील वडिलोपार्जित इब्राहीम महालात होईल. सैफचे वडील मन्सूर अली खान यांचे २२ सप्टेंबर २०११ रोजी दिल्लीत निधन झाले होते. त्यानंतर ३१ ऑक्टोबर रोजी सैफला नवाब करण्यात आले. त्यामुळे निकाह टळला होता. करिना सध्या ‘हिरॉइन’ आणि ‘रेस 2’च्या चित्रीकरणात व्यग्र आहे. निकाहानंतरही करिना चित्रपटात काम करील, असे शर्मिला यांनी स्पष्ट केले आहे.
 
इतक्या वर्षांनी ते लग्नाच्या बंधनात अडकणार असले तरी लग्न अगदी साध्या पद्धतीने केले जाणार आहे. फिल्म इंडस्ट्रीमधले करीना आणि सैफ यांचा खूप मोठा मित्र परिवार आहे. त्यामुळे रिसेप्शन मात्र मोठ्या दिमाखात होणार असल्याची माहिती शर्मिला टागोर यांनी दिली.

First Published: Monday, June 4, 2012, 21:00


comments powered by Disqus