रेमोचा ABCD सिनेमा येतोय... - Marathi News 24taas.com

रेमोचा ABCD सिनेमा येतोय...

www.24taas.com, मुंबई
 
फालतू सिनेमाच्या यशानंतर आता रेमो डिसुझा ABCD सिनेमा घेऊन येतो आहे. रेमोने दिग्दर्शित केलेला हा दुसरा सिनेमा आहे. त्यामुळे हा सिनेमा चर्चेत ठेवण्यासाठी रेमो प्रमोशनचे वेगवेगळे फंडे आत्तापासूनच वापरताना दिसतो. बॉलिवूडला सेलिब्रेशचा फक्त बहाणा हवा असतो. सिनेमाची सक्सेस पार्टी, म्युझिक लाँच पार्टी, बर्थ डे पार्टी हे सारं काही बॉलिवूडला नवं नाही.
 
स्वत:ला चर्चेत ठेवण्यासाठी आणि प्रसिध्दी मिळवण्यासाठी त्यांना हे सारं काही करावंच लागतं. पब्लिसिटीचा हाच फंडा रेमो डिसूझाच्याही चांगलाच पचनी पडलेला दिसतो. त्यामुळेच आपला आगामी ABCD सिनेमासाठी रेमोनेही एक पार्टी दिली. यावेळी या सिनेमाची संपूर्ण टीम आवर्जून उपस्थित होती. डान्सवर आधारित फिल्म प्रेक्षकांसमोर घेऊन येत असल्याचा आनंद यावेळी त्यांनी केक कापून साजरा केला. या सिनेमामध्ये गणेश आचार्य आणि प्रभू देवा मध्यवर्ती भूमिका साकारत आहेत.
 
तर डान्स इंडिया डान्समधून प्रकाशझोतात आलेले सलमान खान आणि वृषालीदेखिल या सिनेमामध्ये प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत. अजून या सिनेमाचा प्रोमोदेखिल पाहायला मिळलेला नाही. मात्र आपल्या सिनेमाला कसं चर्चेत ठेवायचं हे रेमो उत्तम जाणतो.
 
 
 
 

First Published: Tuesday, June 5, 2012, 16:02


comments powered by Disqus