Last Updated: Tuesday, June 5, 2012, 19:58
www.24taas.com, मुंबईभारतात कॅनडाची पॉर्न स्टार सनी लिऑनला मिळत असलेल्या महत्त्वाबद्दल सुप्रसिद्ध लेखिका तसलिमा नसरीन यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सनी लिऑनला भारतात खूप प्रसिद्धी मिळत आहेत, त्यामुळे अशी प्रसिद्धी मिळणे चुकीचे असल्याचे नसरीन यांनी म्हटले आहे.
कॅनडीन पॉर्न स्टार सनी लिऑन सध्या महेश भट्ट यांच्या जिस्म-२ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. तिच्या संदर्भात येणाऱ्या बातम्यांमुळे तिला अधिकच प्रसिद्धी मिळत आहेत. त्यामुळे नसरीन यांनी ट्विटरवर नाराजी व्यक्त केली आहे.
सनी लिऑन हिची उंची अनावश्यकपणे वाढविली जात आहे. जेव्हा तुम्ही पॉर्न स्टारला सेलिब्रिटी बनवतात, त्यावेळी तुम्ही तुमच्या मुलीला अस्ट्रॉनॉट किंवा डॉक्टर इंजिनिअर बनविण्यास प्रोत्साहित करीत नाहीत, तर पॉर्न स्टार बनविण्यासाठी प्रोत्साहित केल्यासारखे आहे, अशा भावना त्यांनी ट्विटरवर व्यक्त केल्या आहेत.
सनी लिऑनला भारतात चित्रपट मिळाल्याने ती सध्या भारतात सेलिब्रिटी म्हणून वावरत आहे. रिअलिटी शो बिग बॉसमध्ये सामिल झाल्यानंतर तिच्या लोकप्रियतेत चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे तिला चित्रपट आणि अनेक जाहिराती मिळाल्या आहेत.
First Published: Tuesday, June 5, 2012, 19:58