'शांघाय'साठी इमरानने पाहिले 'पॉर्न' सिनेमे - Marathi News 24taas.com

'शांघाय'साठी इमरानने पाहिले 'पॉर्न' सिनेमे

www.24taas.com, मुंबई
 
आत्तापर्यंत अनेक सिनेमांत चुंबनांचा पाऊस पाडलेल्या इमरान हाश्मीला आगामी शांघाय सिनेमातील आपल्या कॅरेक्टरच्या तयारीसाठी चक्क पॉर्न सिनेमे पाहावे लागले. आपल्या एका मुलाखतीत इमरानने हे मान्य केलं.
 
“ ‘शांघाय’ सिनेमाचा दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी याने सिनेमातलं माझं पात्र अत्यंत ‘डर्टी’ असल्यानं त्याच्या तयारीसाठी मला पॉर्न सिनेमे पाहायला सांगितलं. या सिनेमातमी एका पत्रकाराची भूमिका साकारत आहे, जो फावल्या वेळात पैसे कमावण्यासाठी पॉर्न फिल्म्स बनवतो. त्यामुळे मला दिबाकरने सांगितलं, यावेळी मला किसिंग सीन परफॉर्म करायचा नसून तो शूट करायचा आहे. त्यामुळे मी त्यासाठी तयारी करण्यासाठीच काही पॉर्न सिनेमे पाहिले.” असं इमरानने मान्य केलं. पण, शांघाय सिनेमाला यू सर्टिफिकेट मिळाल्याबद्दल आपण खूश असल्याचंही इमरान म्हणाला.
 
“माझा मुलगा आत्ता २ वर्षांचा आहे. तो १८ वर्षांचा होईपर्यंत त्याला माझा कुठलाच सिनेमाच पाहाता येणार असं वाटत होतं. पण, या सिनेमाला यू सर्टिइकेट मिळाल्याने मी समाधानी आहे. हा सिनेमा माझा मुलगा पाहू शकतो.”  असं इमरान म्हणाला.
 

First Published: Wednesday, June 6, 2012, 12:49


comments powered by Disqus