मान्सून मध्ये पडणार 'सिनेमांचा पाऊस' - Marathi News 24taas.com

मान्सून मध्ये पडणार 'सिनेमांचा पाऊस'

www.24taas.com, मुंबई
 
मान्सून आला रे. म्हणताना बॉलिवूडमध्येही मान्सून आला आहे तो सिनेमांचा. पावसाळ्यात प्रेक्षकांना तब्बल ३० सिनेमांची मेजवानी मिळणार आहे. या पावसाळ्यात बॉलिवूडमध्येही सिनेमांचा पाऊस पडणार असंच दिसतं आहे. कारण पावसाळ्यात तब्बल ३० सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. जवळपास ५०० कोटींची गुंतवणूक मॉन्सूनमध्ये पाहयला मिळते आहे. काही बिग बजेट फिल्म्सचाही यात सहभाग आहे.
 
सैफ-दिपिकाचा कॉकटेल, सलमान-कतरिनाचा एक था टायगर आणि करिनाचा हिरोईन या पावसाळी मौसमातच प्रदर्शित होणार आहे. यात कुठली फिल्म बॉक्स ऑफीसवर सुपरहिट ठरणार हेच पाहायचं. मागच्या वर्षीही पावसाळा बॉलिवूडसाठी लकी ठरला होता. सिंघम, बॉडीगार्ड, देल्ली बेली, जिंदगी ना मिलेगी दोबारा या फिल्म्स मागच्या वर्षी मान्सूनमध्येच रिलीज झाल्या आणि बॉक्स ऑफीसवर गाजल्या देखील. त्यामुळे मान्सून हा बॉलिवूडसाठी लकी सिझन मानला जातो.
 
नेहमी मे महिना किंवा दिवाळीच्या सुट्टयांची वाट पाहणारे निर्माते या ट्रेण्डमुळे पावसाळ्यातही फिल्म्स रिलीज करण्याचं धाडस करू लागले आहेत. या पावसाळ्यात कॉकटेल, हिरोईन आणि एक था टायगरची प्रेक्षकांना नक्कीच उत्सुकता असेल. फक्त कुठली फिल्म बॉक्स ऑफीसवर पैशांचा पाऊस पाडणार याचीच वाट पाहूया
 
 
 
 
 

First Published: Thursday, June 7, 2012, 11:34


comments powered by Disqus