'रावडी' अमुल बटर - Marathi News 24taas.com

'रावडी' अमुल बटर

www.24taas.com, मुंबई
 
समकालीन गोष्टींवर आपल्या शैलीत भाष्य करण्याबद्दल अमुल बटरच्या पोस्टर जाहिरातची प्रसिद्धच आहेत. लोकही या आठवड्यात अमुल कुठल्या विषयावर नवी जाहिरात करत आहे, याची वाट पाहात असतात.  यावेळीदेखील अमुल बटरने अत्यंत क्रिएटिव्ह जाहिरात बनवली आहे. या वेळी अमुलने विषय घेतला आहे ‘रावडी राठेड’चा.
 
अमुल बटरच्या या आठवड्यातील जाहिरातीत ‘राव़डी राठोड’मधील अक्षय कुमार आपल्या गुलाबी पँट घातलेल्या वेषात प्रभुदेवासोबत कारच्या बोनेटवर बसलेला दिसतो. मात्र सध्या सगळीकडे प्रसिद्ध झालेल्या ‘चिंता ता ता’ या गाण्यातील सिग्नेचर स्टेप करण्याऐवजी तो प्रभुदेवासोबत अमुल बटर खाताना दिसतो.
 
याशिवाय सिनेमातील प्रसिद्ध पंच लाइन ‘डोन्ट अँग्री मी’ऐवजी ‘डोन्ट हंग्री मी’ असं मार्मिक वाक्य लिहिलेलं आहे. सिनेमा सध्या तुफान हिट होत असल्यामुळे त्याचाही संदर्भ घेत अमुल बटरने ‘अमुल सुपरहिट’ असंही लिहिलेलं आहे. एकुणच वर्षांनुवर्षं ताज्या घडामोडींना आपल्या ब्रँडशी जोडणाऱ्या अनेक अविस्मरणिय जाहिराती बनवत अमुलने कलेचे नमुने सादर केले आहेत. आता रावडी राठोडदेखील या यादीत समाविष्ट झाला आहे.

First Published: Thursday, June 7, 2012, 12:51


comments powered by Disqus