शिल्पा शेट्टीच्या मुलाचं झालं बारसं - Marathi News 24taas.com

शिल्पा शेट्टीच्या मुलाचं झालं बारसं

www.24taas.com, मुंबई
 
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या मुलाचं अकेर बारसं झालं. २१ मे रोजी जन्म झालेल्या आपल्या गोंडस बाळाचं नाव शिल्पा सेट्टी आणि राज कुंद्रा यांनी ‘विआन’ असं ठेवलं आहे. ट्विटरवरून यासंदर्भात दोघांनीही अधिकृत घोषणाही केली आहे.
 
राज कुंद्रा यांनी ट्विटरवर लिहिलं, “@दशिल्पाशेट्टी आणि मी अत्यंत अभिमानाने आमच्या मुलाचं नाव ‘विआन’ असं ठेवलं आहे. ‘विआन’ म्हणजे आयुष्य आणि ऊर्जेने ओतप्रोत भरलेला”
 
शिल्पा शेट्टीनेही ट्विटरवरच आपल्या बाळाचे नाव आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केलं आहे. तिने लिहिलं, “ट्विटोज, माझ्या मुलाचं आज बारसं झालं. माझ्या मुलाचं नाव विआन राज कुंद्रा असं आहे. ‘विआन’ म्हणजे ‘आयुष्य आणि ऊर्जेने युक्त’”
 
ट्विटरवर केवळ मुलाचं नाव घोषित करून राज कुंद्रा थांबला नाही, तर आपल्या मुलाचं ट्विटरवर अकाउंटदेखील सुरू केलं आहे.@ विआनराजकुंद्रा या नावाने हे अकाउंट आहे. याबद्दल राज कुंद्राने लिहिलं, “ट्विटरवरील सर्वांत लहान युजरचं म्हणजेच माझ्या मुलाचं ट्विटरवर स्वागत.@ विआनराजकुंद्रा. त्याचे लाड करा म्हणजे तो कदाचित रिप्लाय देईल. ”

First Published: Thursday, June 7, 2012, 14:31


comments powered by Disqus