तात्या विंचू परत येतोय... - Marathi News 24taas.com

तात्या विंचू परत येतोय...

www.24taas.com, मुंबई
 
झपाटलेला मधला तात्या विंचू. भल्या भल्यांना झपाटून टाकणारा हा तात्या विंचू सध्या मात्र स्वत:च झपाटला आहे. महेश कोठारे यांच्या झपाटलेला मध्ये प्रथम याचं दर्शन घडलं.
 
आता महेश कोठारे झपाटलेला चा सिक्वेल आणतायेत तेव्हा तात्या विंचूचं दर्शनंही पुन्हा घडेल. याच दरम्यान तात्या विंचू लगे रहो या टायटलचा दुसरा सिनेमा देखील येतोय. मात्र तात्या विंचू हे माझं प्रोडक्ट आहे असं महेश कोठारेंनी स्पष्ट केलं त्यामुळे तात्या विंचू या नावावरुनंच दोन निर्मात्यांमध्ये वाद निर्माण झाला.
 
तर तात्या विंचू लगे रहो या सिनेमाचे निर्माते अमित कटारिया यांना मात्र हे कोठारेंच हे म्हणणं मान्य नाही. तेव्हा आता प्रेक्षकांना थरारुन टाकणारा हा तात्या विंचू कॉन्ट्रोवर्सीतून कधी बाहेर पडणार याची वाट पाहूया..
 
 
 
 
 

First Published: Friday, June 8, 2012, 16:37


comments powered by Disqus