Last Updated: Sunday, June 10, 2012, 20:23
www.24taas.com, पणजी गाजराची पुंगी या सिनेमाचा खास शो नुकताच गोवा मराठी चित्रपट महोत्सवात झाला.. हा सिनेमा पाहण्यासाठी दर्दी रसिकांनी गर्दी केली होती.
विनोदातून मनोरंजन आणि अंतर्मुख करायला लावणारे अनेक विषय मराठी चित्रपटसृष्टीत आज हाताळले जात आहेत. असाच एक प्रयोग निर्माते सुनील फडतरे आणि दिग्दर्शक तानाजी घाडगे यांच्या आगामी ‘गाजराची पुंगी’ या विनोदी चित्रपटात दाखवला गेला आहे.
फिल्म फेस्टिव्हलमध्ये गंभीर कथानकांच्या सिनेमांना वाहवा मिळत असली तरी हलक्या फुलक्या कथेचा आणि निखळ आनंद देणारा सिनेमाही रसिकांना सुखावून जातो आणि याचा प्रत्यय 5 व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवात तानाजी घाडगे दिग्दर्शित गाजराची पुंगी या सिनेमाने दिला.....या सिनेमाचा खास शो नुकताच या महोत्सवात झाला.....या सिनेमामध्ये सुबोध भावे, प्रसाद ओक, सई ताम्हणकर यांनी मध्यवर्ती भूमिका साकारल्यात...
गाजराची पुंगी या सिनेमाप्रमाणेच महेश मांजरेकर दिग्दर्शित काकस्पर्श हा सिनेमाही महोत्सवात दाखवण्यात आला.. यावेळी सिनेमाची स्टार कास्ट उपस्थित होती. काकस्पर्श आणि गाजराची पुंगी हे दोन्ही सिनेमा पाहण्यासाठी गोवेकरांनी तुफान गर्दी केली होती...आणि आपल्या सिनेमाला मिळालेला चांगला प्रतिसाद पाहून या सिनेमाची टीम सुखावून गेलीय हे नक्की..
First Published: Sunday, June 10, 2012, 20:23