Last Updated: Monday, June 11, 2012, 14:54
www.24taas.com, मुंबई आपल्या बेताल वागण्याने कायम चर्चेत असणारी वीणा मलिक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिचं चर्चेत येण्याचं कारण म्हणजे तिच्यावर फिदा झालेला तिच्याइतकाच बेताल चाहता- राजा चौधरी.
वीणाला भेटल्यावर पुन्हा एकदा राजा आशिक झाला आहे. तो वीणाशी लग्न करण्यासाठी इतका उतावळा आहे की लग्नानंतर आपलं नाव राजा मलिक करून घेण्यासही त्याची हरकत नाही. ‘दाल में कुछ काला है’ या आगामी सिनेमाच्या म्युझिक लाँच सेहळ्याच्यावेळी राजा आणि वीणाची भेट झाली आणि त्यावेळेपासूनच राजा वीणाच्या मागे हात धुवून लागला असल्याचं सांगण्यात येत आहे.
राजा चौधरी टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिचा घटस्फोटित नवरा आहे. राजा चौधरी दारू पिऊन तमाशा करणं, मारामाऱ्या करणं आणि महिलांशी असभ्य वर्तन यांमुळे पुरता बदनाम आहे. आपली पूर्व पत्नी श्वेता तिवारी, प्रेयसी श्रद्धा शर्मा यांनाही त्याने मारहाण केली होती. राजा चौधरी काही दिवस पुनर्वसन केंद्रातही जाऊन आला होता. राजाच्या मागणीला वीणा कसा प्रतिसाद देते हेच आता पाहायचंय.
First Published: Monday, June 11, 2012, 14:54