सलमान लावतोय अजहरुद्दिनच्या संसाराला सुरूंग! - Marathi News 24taas.com

सलमान लावतोय अजहरुद्दिनच्या संसाराला सुरूंग!

www.24taas.com, मुंबई
 
सलमान खानने आपल्या एकेकाळच्या गर्लफ्रेंडबरोबर पुन्हा एकदा रोमांस करायला सुरूवात केली आहे. सलमानची ही माजी गर्लफ्रेंड आहे संगीता बिजलानी. मुख्य म्हणजे संगीता बिजलानी माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस खासदार मोहम्मद अजहरुद्दिन याची पत्नी आहे. अजहरुद्दिन आणि संगीताच्या संसाराला सलमान खानने सुरूंग लावल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.
 
सलमान खान आणि संगीता बिजलानी नुकतेच हॉलीवुड चित्रपट ‘एव्हेंजर’च्या स्क्रीनिंगला एकत्र दिसले होते. अर्थात संगीता बिजलानीला कुठलाही वाद ओढवून घ्यायचा नसल्यामुळे ती मीडियासमोर आपली सलमानबरोबर असलेली जवळीक दाखवत नव्हती. मात्र, ती सलमान खानच्या पुढे मागे घोटाळत होती.
 
इंटरनेटवर दिसत असलेल्या फोटोंमध्ये संगीता आणि सलमानमधली जवळीक स्पष्टपणे जाणवते. आज काल संगीता कित्येकवेळा सलमानच्या घरी असल्याचं निदर्शनास आलं. तसंच सलमानच्या बहिणी अर्पिता आणि अल्विरा यांच्याशीही संबंध वाढवत आहे. सलमान आणि संगीतामधील रोमांस सुमारे १५-१६ वर्षांपूर्वी सुरू झाला होता. मात्र, त्यांचं लग्न होऊ शकलं नव्हतं. त्यानंतर संगीता बिजलानीने मोहम्मद अजहरुद्दिनशी लग्न केलं होतं. मात्र, सध्या संगीता आणि अजहरुद्दिन यांच्या नात्यात तणाव निर्माण झाल्याचं सांगण्यात येत आहे.
 

First Published: Tuesday, June 12, 2012, 08:43


comments powered by Disqus