Last Updated: Friday, June 15, 2012, 12:31
www.24taas.com, मुंबईगझलचे शहेनशाह मेहदी हसन यांच्या निधनामुळे बॉलिवुड शहेनशाह अमिताभ बच्चन खूप दुःखी झाले आहेत. हसन यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाला आहे. मेहदी हसन यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर खूप दुःख झालं. हसन अत्यंत वेगळ्या आणि मार्मिक आवाजाचे मालक होते. त्यांच्या या गुणामुळे त्यांनी जगभरात नाव कमाविल्याचे अमिताभ यांनी आपल्या ट्विटरवर ट्विट केले आहे.
मेहदी हसन यांच्या निधनाने गझल गायकीतील एक युगाचा अंत झाला आहे. माझ्या आठवणीत त्यांच्या काही खास भेटी अजूनही कायम आहेत. भारतात जन्मलेल्या पाकिस्तानचे महान गायक मेहदी हसन यांचे बुधवारी कराचीच्या हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते अनेक दिवसांपासून आजारी होते. शुक्रवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
हसन यांनी एकदा मला सांगितले की, ते खूपच साधारण परिवारातील आहेत. आपला आवाज कणखर करण्यासाठी ते रेल्वे किंवा ट्रॅक्टरच्या आवाजावर अभ्यास करीत होते, असे हसन यांच्याशी झालेल्या भेटीबद्दल अमिताभ यांनी लिहले आहे.
First Published: Friday, June 15, 2012, 12:31