आयटम गर्ल 'प्रियांका'? - Marathi News 24taas.com

आयटम गर्ल 'प्रियांका'?

www.24taas.com, इंदौर


आत्तापर्यंत एकाही आयटम साँगमध्ये न दिसलेली प्रियांका चोप्राही लवकरच एखाद्या झक्कास आयटम साँगमध्ये दिसून येईल, असं दिसतंय. कारण तशी इच्छा प्रियांकानंच व्यक्त केलीय. आपल्याला आयटम साँग करायला काहीच हरकत नसल्याचंही तिनं जाहीर केलंय.


.


एक काळ असाही होता जेव्हा बॉलिवूडच्या अभिनेत्रींना आयटम साँग करायला कमीपणा वाटायचा. पण, आता तर अभिनेत्रिच लोकांची मनं जिंकण्यासाठी आयटम साँगकडे वळताना दिसतायत. मल्लीका अरोरा-खान, कतरिना कैफ, मल्लीका शेरावत, विद्य बालन यांच्यानंतर आता जे नाव पुढे येतंय ते आहे प्रियांका चोप्राचं…  आणि आपल्याला आयटम साँग करण्यात काहीच हरकत नसल्याचं सांगत प्रियांकानंही आयटम साँगला हिरवा कंदील दाखवलाय. कुणाल कोहली दिग्दर्शित ‘तेरी मेरी कहानी’ या सिनेमाचं प्रमोशन करताना पत्रकारांशी बोलताना तीनं आपणही यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलंय. ‘मी अजून कोणतंही आयटम साँग केलेलं नसलं तरी मी स्वत:वर ते न करण्याचंही बंधन घालून घेतलेलं नाही. आणि माझ्याकडे अजूनपर्यंत असं कोणतं आयटम साँगही आलेलं नाही ज्यावर थिरकण्याची माझी इच्छा होईल. पण मला धोके पत्करून वेगवेगळ्या भूमिका करायला आवडतात’ असं प्रियांकानं स्पष्टपणे सांगितलंय.


 
त्यामुळे बॉलिवूडमध्ये सध्या टॉपवर असणाऱ्यांमधली प्रियांकाही जर आपल्याला एखाद्या धम्माल आयटम साँगच्या तालावर थिरकताना दिसली तर आश्चर्य वाटण्याचं काहीच कारण नाही.
 

First Published: Friday, June 15, 2012, 13:26


comments powered by Disqus