फेरारी की सवारी; आमिरही कौतूक करी - Marathi News 24taas.com

फेरारी की सवारी; आमिरही कौतूक करी

www.24taas.com, मुंबई  
 
बॉलिवूड स्टार आणि एक संवेदनशील अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिरला ‘फेरारी की सवारी’ इतका भावलाय की त्यानं हा सिनेमा ‘३ इडियट’पेक्षाही जास्त सफल होईल असं म्हटलंय.
 
फेरारी की सवारी हा सिनेमा या शुक्रवारी प्रदर्शित झालाय. गुरुवारी झालेल्या या सिनेमाच्या प्रिमियरसाठी आमिर खाननंही हजेरी लावली होती. ‘मी इथं आलोय तो या टीमच्या सगळ्या टीमला शुभेच्छा देण्यासाठी’ असं सांगतानाच त्यानं या सिनेमाचं तोंड भरून कौतूक केलंय. ‘शर्मन हा एक चांगला अभिनेता आहे. माझ्या सगळ्या शुभेच्छा त्याच्या पाठिशी असतील. ज्यांनी ज्यांनी ‘३ इडियट’ बघितला असेल त्या सगळ्यांनी फेरारी की सवारी पाहावा, असं मला वाटतं. ‘३ इडियट’पेक्षाही हा सिनेमा यशस्वी होईल’ असं म्हणत त्यानं फेरारी की सवारीच्या सगळ्या टीमला शुभेच्छा दिल्यात. ३ इडियट या सिनेमात शर्मन जोशी आणि आमिर खान यांनी एकत्र कामही केलं होतं.
 
राजेश मापुस्कर दिग्दर्शित आणि विधु विनोद चोप्रा निर्मित ‘फेररी की सवारी’ या सिनेमाची कथा आहे एका पित्याची... जो स्वप्न पाहतोय आपल्या मुलाला क्रिकेटर बनवण्याची... आणि त्यासाठी तो काहीही करायला तयार आहे. ‘पैसे कमावण्यासाठी या सिनेमाची निर्मिती करण्यात आलेली नाही. आम्हाला पैसेच कमवायचे असते तर आम्ही दरवर्षी किमान एक तरी सिनेमा बनवला असता. आम्ही तीन वर्षांमध्ये एक सिनेमा बनवलाय.’ असं सिनेमाचे एडिटर राजकुमार हिरानी यांनी यावेळी म्हटलंय.
 
.

First Published: Saturday, June 16, 2012, 12:45


comments powered by Disqus