'विश्वरूप'... अहो कमल हसनचा नवा सिनेमा... - Marathi News 24taas.com

'विश्वरूप'... अहो कमल हसनचा नवा सिनेमा...

www.24taas.com
 
कमल हसन ब-याच वर्षानंतर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये धमाका करायला सज्ज झाला. कारण विश्वरुप हा त्याचा आगामी सिनेमा लवकरच झळकणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या आयफा सोहळ्यात त्याच्या हिंदी सिनेमाचा ट्रेलर रिव्हील झाला. हिंदी सिनेमातून एक जबरदस्त पुनरागमन करायला कमल हसन सज्ज झाला आहे.
 
तो आपल्या आगामी विश्वरुप या सिनेमातून. रायटर, डायरेक्टर, को प्रोड्य़ूसर आणि अफकोर्स अँक्टर अशी सर्व धूरा या सिनेमाच्या माध्यमातून कमल हसनने सांभाळली. तेलगू, तमीळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे. अँक्शन थ्रीलर असलेल्या या सिनेमात कमल हसन बरोबर तमीळ अभिनेत्री एन्ड्रा, पूजा कुमार संदीप जम्वाल आणि राहुल बोस यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
 
विशेष म्हणजे राहुल बोसने या सिनेमात नेगेटिव्ह रोल साकारला. जावेद अख्तर यांनी या सिनेमाची गाणी लिहीली असून शंकर एहसान लॉय यांचं संगीत या सिनेमाला आहे. स्पाय-थ्रीलर असलेल्या या सिनेमासाठी जवळपास दीडशे कोटी रुपये या खर्च करण्यात आले. ऑगस्टमध्ये हा सिनेमा आपल्या भेटीला येईल.
 
 
 
 
 

First Published: Saturday, June 16, 2012, 21:57


comments powered by Disqus