Last Updated: Wednesday, June 20, 2012, 11:28
www.24taas.com, मुंबई 
मुंबईच्या गोरेगाव फिल्मसिटीतील एका सिनेमाच्या शुटिंगमध्ये १२ फुटांच्या अजगराची एंट्री झाल्यानं एकच धावपळ उडाली होती. अभिनेता तुषार कपूर आणि रितेश देशमुख यांच्या एका सिनेमाचं फिल्मसिटीत चित्रिकरण सुरु होतं.
यावेळी कलाकारांच्या मेकअप रुममध्ये बारा फुटी अजगर असल्याचं कलाकारांच्या निदर्शनास आलं. सिनेमाच्या सेटवर अजगर आल्याचं कळताच सेटवरील कलाकार आणि कर्मचाऱ्यांची पळापळ झाली.
जवळपास अकरा तास अजगर चित्रिकरणस्थळी होता. पोलीस आणि अग्निशमनदलाला माहिती दिल्यानंतरही कोणीही त्याला पकडण्यासाठी आलं नव्हतं. शेवटी पोलीस आणि सर्पमित्रांच्या पथकानं तासाभराच्या प्रयत्नानंतर अजगराला पकडलं.
First Published: Wednesday, June 20, 2012, 11:28