Last Updated: Saturday, June 23, 2012, 23:37
www.24taas.com, मुंबई 
मुंबईतील मेहबूब स्टुडिओला आग लागली आहे. सलमान खानच्या दबंग २ सिनेमाच्या शूटिंग दरम्यान ही आग लागली होती. ही आग शॉर्ट सक्रीटमुळे लागली असल्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.
या आगीत तीन जणं जखमी झाले आहे. जखमींना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या दबंग २ चं शूटिंग मेहबूब स्टुडिओमध्ये सुरू होतं.
या शूटिंग दरम्यान ही घटना घडली आहे. दोनच दिवसांपूर्वी शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत संपूर्ण मंत्रालय भस्मसात झालं होतं आणि आता लगेचच स्टुडिओत ही घटना घडली आहे.
First Published: Saturday, June 23, 2012, 23:37