जुहू रेव्ह पार्टीत अभिनेते-अभिनेत्रींचा समावेश - Marathi News 24taas.com

जुहू रेव्ह पार्टीत अभिनेते-अभिनेत्रींचा समावेश

www.24taas.com, मुंबई
 
जुहूतील येथील ओकवूड प्रीमिअर या आलिशान हॉटेलात २० मे रोजी झालेल्या रेव्ह पार्टीत अमली पदर्थांचं सेवन करणा-यांमध्ये छोट्या पडद्यावरील अभिनेते-अभिनेत्रींचा समावेश असल्याचं उघड झाले आहे.
 
चाचणीत दोषी आढळलेल्यांवर लवकरच अटकेची कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली. त्यामुळे अपूर्व अग्निहोत्री, अंगद बेदी, अंशुमन झा यांच्यासह अनेक उच्चभ्रू दोषींवर कारवाईची टांगती तलवार आहे.
 
ओकवूड हॉटेलमध्ये रेव्ह पार्टीत उपस्थित असलेला अभिनेता अपूर्व अग्निहोत्री याच्‍या रक्ताचा नमुना पॉझिटीव्‍ह आढळला. ही बातमी पसरल्‍यानंतर त्‍याची बोलती बंद झाली आहे. अहवाल प्राप्‍त झाल्‍यानंतर प्रसार माध्‍यमांनी त्‍याची बाजू जाणून घेण्‍यासाठी प्रयत्‍न केल्‍यावर त्‍याच्‍याकडून 'नो कॉमेंट्स', असे उत्तर मिळत आहे.
रेव्‍ह पार्टीतून ताब्‍यात घेतलेल्‍या १२८ जणांपैकी ४४ जणांच्या रक्तांचे नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. या ४४ जणांनी नशा केली होती. पुणे वॉरियर्सचा क्रिकेटपटू राहुल शर्मा आणि व्हेन पार्नेलही या पार्टीत पकडले गेले होते. त्यांचा अहवाल अद्याप पोलिसांना मिळालेला नाही. परंतु, अभिनेता अपूर्व अग्निहोत्रीच्या रक्ताचा नमुना पॉझिटीव्ह असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे त्याच्यावर काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.
 
अपूर्व अग्निहोत्री आणि त्याची पत्नी शिल्पा (क्योकी सास भी कभी बहू थी फेम) यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांनी त्‍यावेळी मात्र निर्दोष असल्याचा दावा केला होता. पत्रकार परिषद घेऊन त्‍यांनी बाजू मांडली होती. पोलिसांवरही दोघांनी चांगलीच आगपाखड केली होती. त्या तो दोषी आढल्याने त्याची बोलती बंद झाली आहे.

First Published: Sunday, June 24, 2012, 15:44


comments powered by Disqus