कतरिना विचारते, सलमान लग्न कधी करणार? - Marathi News 24taas.com

कतरिना विचारते, सलमान लग्न कधी करणार?

www.24taas.com
 
सलमान कधी करणार लग्न. हा प्रश्न आम्हांला नाही तर तमाम बॉलिवूडकरांना पडला आहे. एवढंच नाही तर सलमानची एक्स-गर्लफ्रेण्ड कतरिनाने हेच विचारलं आहे सलमानला. सलमान खान बॉलिवूडचा मोस्ट वॉण्टेड बॅचलर. या बॅचलरचं लग्न कधी होणार याचीच सगळे वाट पाहत आहेत. सलमानची एक्स-गर्लफ्रेण्ड कतरिनादेखील वाट पाहते आहे सलमानच्या लग्नाची...
 
विश्वास नाही बसत ना...पण खुद्द कतरिनालाच सलमानच्या लग्नाची चिंता लागून राहिली आहे. कतरिनाला सुद्धा सलमान लग्न कधी करतोय याची उत्सुकता आहे.. यशराज बॅनरच्या 'एक था टायगर'मध्ये कतरिनाने सलमानला हाच प्रश्न विचारला आहे. एवढंच नाही तर सलमानचा बेस्ट फ्रेण्ड आमीर खानदेखील सलमानच्या लग्नाची वाट पाहतो आहे. मिडीयासमोर आमीरने कित्येक वेळा जाहीरपणे सांगितलं आहे.
 
सलमानच्या गर्लफ्रेण्ड्स तर खूप होत्या पण सलमानला लग्न कोणाशी करायचंय हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे...खुद्द कतरिनालादेखील हाच प्रश्न पडला आहे. आमीरसुद्धा हेच विचारतो. यावर सलमानचं म्हणणं काही का असेना पण तमाम बॉलिवूडकर सलमानच्या लग्नाची वाट पाहतात एवढं मात्र नक्की.
 
 
 

First Published: Friday, June 29, 2012, 17:54


comments powered by Disqus