Last Updated: Friday, June 29, 2012, 19:28
www.24taas.com, मुंबई 
आज बॉक्सऑफिसवर मॅक्सिमम, थ्री बॅचलर्स, दाल में कुछ काला है आणि द अमेझिंग स्पायडरमॅन या फिल्मस रिलीज झाल्या या सिनेमाला ओपनिंग मिळालं ते असं. वीणा मलिकच्या डाल मे कुछ काला है आणि शर्मन जोशी, रायमा-रिया सेन स्टारर ३ बॅचलर्स सिनेमांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे.
स्पायडरमॅन सिरीजमधल्या द अमेझिंग स्पायडरमॅन सिनेमाची प्रेक्षकांना इतके दिवस उत्सुकता होती. मात्र, आज बॉक्सऑफिसने आपलं खातं उघडताच त्यांची ही उत्सुकता संपली.. तरुण प्रेक्षकवर्गाची पाऊलं वळली ती थेट सिनेमागृहाकडे तेही आपल्या लाडक्या स्पायडरमॅनला पाहण्यासाठी. स्पायडरमॅनचा करीष्मा पुन्हा एकदा सिल्व्हर स्क्रीनवर पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली.
या सिनेमाला पहिल्यादिवशी ८० टक्के ओपनिंग मिळालं. मात्र हा सिनेमा प्रेक्षकांना आवडला असला तरी स्पायडरमॅनचे आधीचे भाग अधिक चांगले होते असंही प्रेक्षक सांगायला विसरले नाहीत. तर दुसरीकडे मॅक्सिमम सिनेमाला पहिल्यादिवशी फक्त ४० टक्केच ओपनिंग मिळालं आहे. तर एकूणच या आठवड्यात स्पायडरमॅन आपलं जाळं पसरवण्यात यशस्वी ठरलाय हे नक्की.
First Published: Friday, June 29, 2012, 19:28