प्रियांकाचे जीवनगाणे... - Marathi News 24taas.com

प्रियांकाचे जीवनगाणे...

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 

प्रियांका सध्या चिंताग्रस्त आहे... अहो का म्हणून काय विचारता ? लवकरच तिचा पहिला वहिला गाण्यांचा अल्बम रिलीज होणार आहे. आता तुम्ही म्हणाल की प्रियांकाचे गाणं ऐकून लोकांना झोप येईल अशी तिला चिंता वाटते का ? नाही नाही तसं नाही हो. प्रियांकाला वाटतं की तिने लिहिलेल्या गीतांमधून तिच्या खाजगी आयुष्याचे गुपित लोकांसमोर उघड होईल. याचा अर्थ असा की आपल्या प्रतिभाशक्तीने आकाशाला गवसणी घातल्याने गाणी अर्थगर्भ झाली आहेत आणि दुसरं आपला अल्बम लोकं तन्मयतेने ऐकतील असा जबरदस्त आत्मविश्वास प्रियांकाला वाटतो असा होऊ शकतो.
 
बाई ग लोकांचा काही भरवसा नसतो आता हेच बघ ना सात खून माफ हा विशाल दिग्दर्शित सिनेमाचा लोकांनी मुडदा पाडला हे इतक्यात कसं काय विसरलीस. लोकांना प्रथम दर्शनी चांगल्या वाईटाची बऱ्यापैकी कल्पना येते. त्यामुळे तुझ्या अल्बमने तुझ्या जन्माची चित्तरकथा उघड होईल म्हणून तू फार टेन्शन घेऊ नकोस. आणि तसंही भारतीय लोक अल्बमला फार डोक्यावर उचलून घेत नाहीत. आणि भारतातल्या सिने तारकांच्या भानगडींच्या रसभरीत कहाण्या लोक चवीने वाचतात खरं त्या गाण्यातून ऐकतील का हे तुझ्या अल्बमला मिळणाऱ्या यशावरुन सिद्ध होईल. बघु या काय होतं ते.

First Published: Sunday, December 11, 2011, 14:46


comments powered by Disqus