रजनीकांत सर्वांत महाग 'आयटम बॉय' - Marathi News 24taas.com

रजनीकांत सर्वांत महाग 'आयटम बॉय'

www.24taas.com, मुंबई
 
आमिर खानच्या बहुप्रतिक्षित ‘तलाश’ मध्ये रजनीकांत आयटम डान्स करण्यास तयार झाला आहे. मात्र या आयटम साँगसाठी रजनीकांतने जे मानधन सांगितलं ते मात्र थक्क करणारं आहे.
 
सिनेवर्तुळात अशी चर्चा आहे की आयटम बॉय बनण्यासाठी रजनीकांत यांनी चक्क १५ कोटी रुपये घेतले आहेत. रजनीकांत पहिल्यांदाच अशा प्रकारचं आयटम साँग करत आहेत. रजनीकांत अयटम साँग करत आहेत म्हणजे हे गाणं धमाकेदार होणार यात काही शंकाच नाही.
 
एवढंच नाही, तर या आयटम साँगवर ५० कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. जवळपास २०० देशांमधील ५० ठिकाणांवर या गाण्याचं शुटिंग होणार आहे. या गाण्यात अभिनेते, खेळाडू इत्यादी वेगवेगळे सेलिब्रिटी परफॉर्म करणार आहेत.

First Published: Tuesday, July 3, 2012, 10:54


comments powered by Disqus