शत्रुघ्न सिन्हा हॉस्पिटलमध्ये - Marathi News 24taas.com

शत्रुघ्न सिन्हा हॉस्पिटलमध्ये

www.24taas.com, मुंबई
 
बॉलिवूड अभिनेते, भाजपाचे माजी मंत्री आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे अंधेरीमधील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ६६ वर्षीय शत्रुघ्न सिन्हा यांना दुपारच्या सुमारास श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता. सिन्हा यांच्या घरी चालू असणाऱ्या रंगकामामुळे शत्रुघ्न सिन्हा यांना हा त्रास झाल्याचं सांगण्यात येत आहे.
 
शत्रुघ्न सिन्हा यांची प्रकृती आता स्थिर आहे. कोकिलाबेन हॉस्पिटलचे डॉ. राम नारायण म्हणाले की सिन्हा यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यावर हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. ऍलर्जीमुळेच त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला होता. योग्य उपचार झाल्यावर त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. आज शत्रुघ्न सिन्हा हॉस्पिटलमध्ये राहातील. त्यांना कधी घरी पाठवायचं, याचा निर्णय उद्या घेण्यात येईल. या वेळी शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत पत्नी पूनम सिन्हा आणि मुलं लव-कुश सिन्हा होते.
 
शत्रुघ्न सिन्हा यांच्या आजारपणाबद्दल उठलेल्या वावड्यांना त्यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा हिने ट्विटरद्वारे प्रत्युत्तर दिलं आहे.”एखाद्याच्या आजारपणावरून राईचा पर्वत करणं चुकीचं आहे. माझे बाबा माझी घरी वाट पाहात आहेत. आय़सीयूमध्ये नाही. टीव्हीवर दाखवत आहेत, तितकं गंभीर काहीच नाही. त्यांच्या तब्येतीची तुम्हाला काळजी आहे, याबद्दल धन्यवाद. पण कृपया... खामोश!!”\

First Published: Tuesday, July 3, 2012, 11:40


comments powered by Disqus