कपड्या’वीणा’ फोटोंमुळे धमकीचे फोन! - Marathi News 24taas.com

कपड्या’वीणा’ फोटोंमुळे धमकीचे फोन!

झी २४ तास वेब टीम, मुंबई
वीणा मलिकचे कपड्या’विना’ फोटो दिल्याने आता ती मोठ्या अडचणीत सापडली आहे. पाकिस्तानी मॉडेल वीणा मलिक हीने काही दिवसांपूर्वी एका मॅगझीनला टॉपलेस फोटो दिल्यानंतर दररोज तिला नव्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आता हे टॉपलेस फोटो काढल्याबद्दल वीणा मलिकला धमकीचे फोन येत आहेत.
जेव्हापासून माझे नग्न फोटो इंटरनेटच्या माध्यमातून जगासमोर आलेत, तेव्हापासून मी फार कठीण परिस्थितीतून जात असल्याचे वीणाने सांगितले. मी शुटींगदरम्यान कपडे घातले होते, असे वीणाने स्पष्ट केले. मी जे केले नाही त्यामुळे मला आता धमकीचे फोन येत आहे, अशी तक्रार वीणाने केली आहे. त्यामुळे माझे जीवन नरक बनले असल्याचेही तीने सांगितले.
या सर्व प्रकारानंतर आता माझे वडीलही माझ्याशी बोलत नाही, की माझ्या फोनचा किंवा ईमेलचे उत्तरही देत नसल्याचे वीणाने सांगितलं.  परंतु ते माझ्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास तीने व्यक्त केला.
वीणाने एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, की मला अनेक माध्यमातून विरोध केला जात आहे, तसेच अनेक धमक्यांचे फोनही येत आहेत. आता मी एका विचित्र परिस्थिती अडकली आहे. मी ओरडून सांगते की मी त्या प्रकारची व्यक्ती नाही की ज्या पद्धतीने मला दाखविण्यात येत आहे. माझे म्हणणे बहिऱ्या कानांवर आदळत असल्याचे मला वाटतंय. मी अशा परिस्थितीत स्वतःला कधी अपेक्षित केले नव्हते. आता प्रत्येक दिवस माझ्यासाठी अडचणींनी भरलेला असल्याचेही तीने सांगितले.
 

First Published: Monday, December 12, 2011, 15:58


comments powered by Disqus