मी स्प्लिट पर्सनॅलिटी आहे- वीणा मलिक - Marathi News 24taas.com

मी स्प्लिट पर्सनॅलिटी आहे- वीणा मलिक


www.24taas.com, मुंबई
 
पाकिस्तानी मॉडेल कम अभिनेत्री वीणा मलिक हिचं म्हणणं आहे की ती एक नसून दोन आहेत. म्हणजेच तिला दुभंग व्यक्तिमत्वाची समस्या आहे. झहिदा मलिक या नावाने तिचा जन्म झाला होता.
 
“मला स्प्लिट पर्सनॅलिटी आहे. वीणा मलिक मी १० वर्षांची असताना जन्माला आली. झहिदा खूप शांत आणि संयमी आहे. ती एका कोपऱ्यात शांत बसून असते आणि कायम रडत असते. ती पटकन प्रेमात पडते. तिला एकाच पुरूषाशी एकनिष्ठ राहायचं आहे. तिला लाईट्स, कॅमेरा यांसारख्या शो बिझनेसमध्ये काडीचाही रस नाही. ती खूप साधी मुलगी आहे.” असं वीणा मलिक पत्रकारांशी बोलताना म्हणाली.
 
“वीणा मात्र खूप वेगळं व्यक्तिमत्व आहे. मी झहिदाला बऱ्याचवेळा चुकीच्या प्रेमसंबंधांपासून वाचवलं आहे. वीणा अतिशय धीट आहे. ती कधी रडत नाही. ती खूप स्ट्राँग आहे. नशीब माझं चांगलं आहे की मी मानसशास्त्राचा अभ्यास केला. त्यामुळेच मी स्वतःला चांगलं समजू शकले. मी एका वेळी दोन माणसांचं आयुष्य जगत आहे.”
 
'दाल में कुछ काला है' या आपल्या पहिल्याच बॉलिवूड सिनेमात वीणाने डबल रोल केला होता.

First Published: Thursday, July 5, 2012, 09:21


comments powered by Disqus