दहा ललना म्हणतात... 'नवरा माझा भवरा' - Marathi News 24taas.com

दहा ललना म्हणतात... 'नवरा माझा भवरा'

www.24taas.com, मुंबई
 
दहा मराठी तारका एकाच गाण्यात दिसल्या तर तुम्हीही थक्क व्हाल ना. लवकरच हे धमाल गाणं तुम्ही पाहणार आहात नवरा माझा भवरा या सिनेमात. निलेश साबळेसोबत १० ललना थिरकणार आहेत. गाण्यात  गिरीजा ओक, मृण्मयी देशपांडे, भार्गवी चिरमुले, सोनाली खरे यांसारख्या हॉट नायिका ताल धरणार आहेत.
 
१० हॉट नायिका जणू काही अप्सराच त्याही एकाच गाण्यात. एकाच अभिनेत्यासोबत थिरकणार. आहे की नाही एन्टरटेन्मेंटची भन्नाट ट्रीट. तुम्हांला हा नजारा पाहायला मिळणार आहे 'नवरा माझा भवरा' या सिनेमात. बाई बाई किती ग लाजाळू या गाण्यात निलेश साबळे आणि त्याच्यासोबत १० मराठी तारका ताल धरणार आहेत. हे भन्नाट गाण्याची कोरिओग्राफर आहे दिपाली विचारे.
 
१० नायिकांसोबत एकाच गाण्याची कोरिओग्राफी करण्याचं आव्हान तिने स्विकारलं आहे. या सर्वांसोबत एकट्या निलेशने डान्स केलाय त्यामुळे तो भन्नाट खूश असणार हे नक्की. एकंदर १० तारकांसह भेटीला येणारं हे भन्नाट गाणं प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील अशी आशा करू.
 
 
 

First Published: Thursday, July 5, 2012, 10:42


comments powered by Disqus