सोशल मीडियात सलमानची 'दबंग'गिरी - Marathi News 24taas.com

सोशल मीडियात सलमानची 'दबंग'गिरी

www.24taas.com, नवी दिल्ली 
 
‘दबंग’स्टार सलमान खान हिंदी सिनेमातल्या बड्या बड्या आसामींना मागे टाकत सोशल मीडियातला ‘मोस्ट पॉप्युलर’ अभिनेता बनलाय.
 
सोशल नेटवर्किंग वेबसाईटवर लक्ष ठेऊन असणाऱ्या ‘फेमकाऊंट’ या वेबसाईटनं नुकतंच एक परिक्षण लोकांसमोर मांडलंय. यामध्ये ‘दबंग - चुलबुल पांडे’ सर्वात लोकप्रिय ठरलाय. हिंदी सिनेमा स्टार अमिताभ बच्चनल, किंग खान, शाहरुख तसंच कमल हसनसारख्या दक्षिण भारतीय सुपरस्टार्सना मागे टाकत सलमान खाननं सोशल मीडियामध्ये लोकप्रियतेच्या बाबतीत आघाडीचं स्थान पटकावलंय. फेमकाऊंटच्या म्हणण्यानुसार सलमान खानच्या चाहत्यांची संख्या तब्बल 34,544,207 वर पोहचलीय. तर फेसबूक तब्बल 4,425,446 जण सलमान खानला पसंती दिलीय तर ट्विटरवर 23 लाखांहून अधिक लोक सलमानच्या टिवटिव फॉलो करत आहेत. ‘बीबी हो तो ऐसी’ या चित्रपटाद्वारे आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या सलमाननं आत्तापर्यंत 80 हून अधिक सिनेमांमध्ये काम केलंय.
 
सोशल मीडियात लोकप्रियतेत सल्लूमियाँनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे, बॉलिवूडचा ‘बेताज बादशाह’ शाहरुख खान... तर तिसऱ्या नंबर  पटकावलाय ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खाननं. चौथ्या क्रमांकावर मात्र कुणी अभिनेता नाही तर अभिनेत्री आहे... ती म्हणजे प्रियांका चोप्रा. फेमकाऊंटच्या म्हणण्यानुसार सोशल मीडियात ‘देसी गर्ल’चे चाहत्यांची संख्या आहे, तब्बल 24,630,818.  फेमकाऊंटच्या या परिक्षणात पाचव्या क्रमांकावर ऋतिक रोशन, सहाव्या क्रमांकावर अक्षय कुमार, सातव्या क्रमांकावर रणवीर कपूर, आठव्या स्थानावर दीपिका पदूकोण, नवव्या स्थानावर अमिताभ बच्चन तर दहाव्या नंबरवर शाहिद कपूर आहे. तर दक्षिण भारतीय सुपरस्टार कमल हसन याचा नंबर आहे अठरावा...

First Published: Thursday, July 5, 2012, 14:04


comments powered by Disqus