Last Updated: Friday, July 6, 2012, 16:29
www.24taas.com, मुंबई 
‘गैंग्स ऑफ वासेपुर’ अनुराग कश्यपची आजवर सगळ्यात सफल झालेला सिनेमा आहे. सिनेमा प्रर्दशित झाल्यानंतर अनुराग भलताच खूश झाला आहे. त्याने १०० कोटी बॉक्स ऑफिसवर कमाई होईल अशी कधीच अपेक्षा केली नव्हती. ‘गैंग्स ऑफ वासेपुर’ ही सामाजिक-राजकीय घटनांवर आधारित सिनेमा आहे. या सिनेमाचे दिगदर्शक आणि लेखक दोन्हीही अनुराग कश्यप हेच आहेत. ‘गैंग्स ऑफ वासेपुर’च्या या यशानंतर त्याचा दुसरा भागही लवकरच म्हणजे ८ ऑगस्टला प्रदर्शित केला जाणार आहे.
सिनेमाला मिळालेल्या यशानंतर आयोजित करण्यात आलेल्या पार्टीमध्ये अनुरागने पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा त्याने सांगितले की, पहिले तीन दिवस ह्या सिनेमाने इतकी कमाई केली नव्हती. मात्र आता हा सिनेमा सगळ्यात जास्त 'कमाई' करणारा सिनेमा ठरला आहे. ह्या सिनेमात अशा काही घटना आहेत. ज्यामुळे हा सिनेमा दोन भागामध्ये करण्यात आला आहे.
सिनेमात मनोज वाजपेयी, नवाजुद्दीन सिद्दकी, हुमा करैशी, रिचा चड्ढा, रीमा सेन आणि तिग्मांशु धूलिया यांनी कसदार अभिनयाचा नमुनाच पेश केला आहे. या सिनेमाने आतपर्यंत चांगली कमाई केली आहे. त्यामुळे येणारा पुढील ‘गैंग्स ऑफ वासेपुर - २’ हा देखील चांगली कमाई करेल अशी आशा अनुरागला वाटते आहे.
First Published: Friday, July 6, 2012, 16:29