सलमानचा शक्तीला शाब्दिक 'तोहफा' - Marathi News 24taas.com

सलमानचा शक्तीला शाब्दिक 'तोहफा'

झी २४ तास वेब टीम, मुंबई
बिग बॉस 5 मधून शक्ती कपूरची हकालपट्टी झाली असली तरीत्यानेसलमान खानशी झालेलं भांडण मिटवलेलं नाही. शक्ती कपूरने आपल्या चांगल्या प्रकारच्या वर्तणुकीने घरातील इतर सहकलाकारांचा आदरही प्राप्त केला. खरोखरीच शक्ती बदलला आहे आणि त्याच्यात बरीच सुधारणा झाल्याचं दिसून आलं आहे.
 
बिग बॉसमधल्या मुक्कामा संबंधी तसंच सलमान खानशी असलेल्या संबंधांविषयी तो म्हणाला की आज मी खुप संयमित झालो आहे तसंच माझ कुटुंब माझं सर्वस्व आहे असं शक्ती जे म्हणतो तेंव्हा तो आंर्तबाह्य बदलला आहे याची खात्री पटावी. बिग बॉसने आपल्याला भरपूर पैसे दिल्याचंही त्याने सांगितलं. सलमान बद्दल विचारलं असता तो म्हणाला की सलमानने माझी माफी मागावी.
 
सलमान आणि संजय दत्तनी बिग बॉसच्या घराला भेट दिली तेंव्हा त्या दोघांनीही माझी दखलही घेतली नाही. पण हे कमी की काय सलमाने बिग बॉस को मानना पडेगा शक्ती कपूर जैसे लोगों को अपने घर बुलाया हम तो कभी ना बुलायेंगे अशी शेरीबाजी केली. आता हे ऐकून शक्ती खवळला नसता तरच नवल तो म्हणाला की माझ्याकडून त्याच्या बाबतीत कोणतीच आगळीक झालेली नसताना त्याने अशी मुक्ताफळं का उधळावीत त्यामुळे सलमानने आपली माफी मागावी अशी शक्तीची मागणी आहे. शक्ती म्हणतो की सलमानने घरी बोलावलं तरी देखील मी जाणार नाही. तर एकूण काय सलमानच्या वाग्बाणाने शक्ती घायाळ झाला आहे हे खरं.

First Published: Tuesday, December 13, 2011, 13:30


comments powered by Disqus