Last Updated: Tuesday, December 13, 2011, 15:07
झी २४ तास वेब टीम, मुंबईहृतिक रोशन पुन्हा एकदा जखमी झाला आहे. क्रिश 3 च्या फिल्मीस्तान स्टुडिओत चित्रीकरणाच्या वेळेस तो खाली पडला आणि त्याला जबर मार लागला आहे. हृतिक या सिनेमासाठी राकेश रोशन यांना दिग्दर्शनासाठी सहाय्य करत आहे. हृतिकने जखमी झाल्यानंतर स्वत:च प्रथमोपचार करण्याचा प्रयत्न केला. पण हाताची त्वचा फाटल्याने जखम खोलवर असल्याचं त्याच्या
लक्षात आलं. हृतिकला त्यानंतर शुटमधून विश्रांती घ्यावी लागली.
ही घटना मागच्या आठवड्यात घडली. त्यामुळे क्रिशच्या सेटवर सगळेजण चिंताग्रस्त झाले होते पण हृतिकने शुट थांबून दिलं नाही असं एका युनिटमधील सदस्याने सांगितलं. याआधी हृतिकची ऑक्टोबर महिन्यात अग्निपथच्या रिमेकसाठी ऍक्शन सीन करताना पाठ दुखावली होती त्यानंतर त्याला उपचारासाठी ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करावं लागलं.
First Published: Tuesday, December 13, 2011, 15:07